Ad will apear here
Next
‘हॅम्लेट’च्या कलाकारांशी रत्नागिरीत गप्पागोष्टी


रत्नागिरी : जिल्हा नगर वाचनालय आणि चतुरंग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वाचनालयाच्या सभागृहात तीन फेब्रुवारी २०१९ रोजी सायंकाळी पाच वाजता ‘हॅम्लेट- एक शिवधनुष्य’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. यात ‘हॅम्लेट’मधील कलाकारांशी मुलाखत वजा गप्पागोष्टींचा कार्यक्रम रंगणार आहे.

नाट्यनिर्मितीच्या प्रारंभापासून ते आतापर्यंतच्या वाटचालीतील कुतुहलपूर्ण घटना, गोष्टींचा मागोवा घेणाऱ्या या मुलाखतीमध्ये सुमित राघवन, मुग्धा गोडबोले, तुषार दळवी, सुनील तावडे, निर्माते श्रीपाद पद्माकर ही नाटकातीलच मंडळी उपस्थित राहून त्यांचा अनुभव कथन करणार आहेत. त्यांची मुलाखत कणकवलीचे (जि. सिंधुदुर्ग) प्रख्यात रंगकर्मी, लेखक, दिग्दर्शक वामन पंडित घेणार आहेत.

निर्मितीसाठी ‘हॅम्लेट’सारखे निवडलेले अत्यंत जगप्रसिद्ध आणि विश्वविख्यात नाटक, चंद्रकांत कुलकर्णींसारख्या दिग्गजाचे दिग्दर्शन, अंगावर येणारे भव्य नेपथ्य, मातब्बर अभिनेते-अभिनेत्रींच्या अभिनयाची परिमाणकारकता, देखणी- श्रीमंत निर्मिती, लक्षवेधी पार्श्वसंगीत आणि लक्षात राहणारी सुसंगत वेशभूषा अशी सारी नाट्यवैशिष्ट्ये ध्यानात घेऊन चतुरंग प्रतिष्ठान आणि रत्नागिरी नगर वाचनालय यांनी आपल्या उपक्रमांतगर्त ‘हॅम्लेट’च्या नाट्यावलोकनाचा, गप्पागोष्टीमय मुलाखतीचा हा विशेष कार्यक्रम रत्नागिरीमध्ये आयोजित केला आहे.

‘हा कार्यक्रम नि:शुल्क असून, समस्त रत्नागिरीकरांनी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,’ असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.

कार्यक्रमाविषयी :
दिवस :
रविवार, तीन फेब्रुवारी २०१९
वेळ : सायंकाळी पाच वाजता
स्थळ : रत्नागिरी जिल्हा नगरवाचनालयाचे सभागृह, जयस्तंभ, रत्नागिरी.  
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZFCBW
Similar Posts
अशोक समेळ करणार ‘मी अश्वत्थामा’चे अभिवाचन रत्नागिरी : महाभारतकालीन व्यक्तिरेखेवर सुमारे २०-२१ वर्षे सखोल चिंतन व अभ्यास करून लिहिलेल्या ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ या गाजलेल्या कादंबरीचे अभिवाचन आणि ती लिहिताना आलेले अनुभव अशोक समेळ यांच्या स्वतःच्या शब्दांत आणि त्यांच्या पत्नी संजीवनी समेळ यांच्या समवेत रत्नागिरीकरांना ऐकण्याची संधी मिळणार आहे
रत्नागिरी नगर वाचनालयात परिसंवादाचे आयोजन रत्नागिरी : जिल्हा नगर वाचनालय व रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने १८ एप्रिल २०१९ रोजी सायंकाळी सहा वाजता रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या सभागृहात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा परिसंवाद ‘भारतीय लोकशाही आणि देशापुढील आव्हाने’ या विषयवर होईल.
नगर वाचनालयातर्फे कथाकथन व निबंधलेखन स्पर्धा रत्नागिरी : सध्याचे वर्ष हे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे (पुलं), आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखले जाणारे ग. दि. माडगूळकर (गदिमा) व संगीतातील अध्वर्यू व्यक्तिमत्त्व सुधीर फडके (बाबूजी) या त्रयीच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयातर्फे निबंध व कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे
‘घातसूत्र’चे दीपक करंजीकर रत्नागिरीकरांच्या भेटीला रत्नागिरी : जिल्हा नगर वाचनालयातर्फे आयोजित ‘लेखक तुमच्या भेटीला’ या उपक्रमात ‘घातसूत्र’ या कादंबरीचे लेखक दीपक करंजीकर रत्नागिरीकरांच्या भेटीला येणार आहेत. हा कार्यक्रम आठ एप्रिल २०१९ रोजी सायंकाळी सहा वाजता नगर वाचनालयाच्या सभागृहात होईल.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language